मर्मबंधातल्या तुझ्या स्म्रुतीनी स्वप्न माझे भंगले,
विरहात तुझ्या जिवघेण्या दु:ख माझॆ रंगले.
काय उमगले त्या क्षणांनी भावना ही शब्दातीत ती,
वसंताचा शिशीर व्हावा वेदना ही ह्रुदयातली.
जिवन-सिंधू लहरीनी माझ्या का रहावे स्तब्ध हे,
का असे असावे विस्कट्लेले माझे ते प्रारब्ध हे.
तृषार्त चातकाने पर्जन्याची मनीषा आकंठ करायाची,
मिलनाच्या त्या क्षणांची वाट मी ही पहायची,
वाट मी ही पहायची, वाट मी ही पहायची.
-हर्षल श. नेने
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment